जे.डब्लू.सी कंपनीत हिंद भारतीय जनरल कामगार सेनेची स्थापना
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
पळस्पे हद्दीत असणाऱ्या जे.डब्ल्यू सी या कंपनीतील कामगारांनी शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेना संघटनेचे नेतृत्व स्वीकारले असून कंपनी गेटवर भारतीय जनरल कामगार सेना नामफलकाचे अनावरण शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे निलेश अप्पा पराडकर उपस्थित होते. याप्रसंगी आप्पा पराडकर यांनी बोलताना सांगितले की, या कंपनीतील कामगारांनी हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदसत्व स्विकारले आहे.त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नसून कामगारांच्या हितासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

यावेळी कंपनी गेटवर नामफलकाचे अनावरण करताना संघटनेचे सरचिटणीस घनश्याम नाईक यांनीही बोलताना सांगितले की, शिवसेना प्रणीत भारतीय जंगल कामगार संघटना कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी असून पुढील काळात जे.डब्ल्यू .सी लॉजिस्टिक कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या पूर्ण करू असे सांगितले.
संघटनेचे उपाध्यक्ष दशरथ भाई घाडी , विजय गवळी दत्ता तांडेल आणि माने साहेब, जिल्हाध्यक्ष केवल माळी खालापूर विभाग अध्यक्ष राजेश कुरगळे ,कल्पेश चितळे दिपक पाटील व पदाधिकारी यांच्यासह कामगारवर्ग यावेळी उपस्थित होता.








Be First to Comment