सिटी बेल लाइव्ह । बीड । प्रतिनिधी ।
बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकारांना जिल्ह्यातुन हद्दपार करा अशी मागणी मौजे करी, तालुका धारूर, जिल्हा बीड येथील सावकारग्रस्त शेतकरी दत्तात्रेय रामकीसान मोरे यांनी एका निवेदनाद्वारे माजलगाव येथील उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
धारूर तालुक्यातील अवैध सावकार उर्मिला भाऊसाहेब कडू, आकाश, विकास व अमोल भाऊसाहेब कडू, श्रीमंत रंगनाथ शिंदे, मारुती रंगनाथ शिंदे, गोविंद मारोती शिंदे, चंद्रकांत आत्माराम पावर, बालासाहेब आत्माराम पवार,बालासाहेब रामभाऊ बडे व दिलीप रामभाऊ बडे या अकरा जणांनाची बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील अनेक खेड्यात अवैध सावकारी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. व हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असूनपिढीत शेतकऱ्याला जीवे मारण्याची भीती निर्माण झाली असून त्याच्यामुळे परिसरातील शेतकरी, कामगार व श्रीमिक वर्ग त्रस्त आहे. वरील सावकारांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.
सवकारांवर मोक्का कायद्यानुसार गुन्हे दाखल करा
बीड जिल्ह्यातील धारूर परिसरात सावकारग्रस्त शेतकरी दत्ता मोरे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांचे विरुद्ध वरील अकरा लोकांनी जीवे मारण्याचा कट रचलेला आहे व सर्व सावकारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. असे असतांना मोरे यांनी शासनाने संरक्षण द्यावे व सदरील अवैध सवकारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा 2005 (मोक्का) नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत व सादरील व्यक्तीना तात्काळ अटक करवी.
बालासाहेब भाबट,
प्रदेशाध्यक्ष
सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्र








Be First to Comment