सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
कोप्रान कारखान्यात कंञाटी कामगार म्हणून सोळा वर्षापासून वर्ष काम करणारा संदेश करताडे आणि अन्य एकाला दिवाळीच्या तोंङावर ठेकेदाराने कामावरून अचानक कमी केल्यानंतर अद्याप कामावर न घेतल्याने संदेशने कोप्राण कंपनीच्या गेटवर उपोषण सुरू केले आहे.
या आधी कामगार आयुक्तानी मध्यस्तीची भूमिका घेतल्याने संदेशने पहिले उपोषण मागे घेतले होते.कोप्रान कारखान्यात कंञाटी कामगार म्हणून सोळा वर्षापासून काम करणारा संदेशसह एकाला दिवाळीच्या तोंङावर ठेकेदाराने कामावरून अचानक कमी केले होते. या अन्यायाविरोधात संदेश त्याची पत्नी रोहिणी(वय25) व आई सुमन करताङे(वय55)यांच्यासह 11नोव्हेंबर पासून कारखाना परिसरात उपोषणाला बसले होते.
उपोषणाबाबत कामगार आयुक्त राजेश पवार यांना माहिती दिल्यानंतर मंगळवार 17नोव्हेंबरला व्यवस्थापना बरोबर बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यानंतर संदेश यांनी उपोषण मागे घेत असल्याचे पञ पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांना कुटूंबासह उपोषण मागे घेतले होते.परंतु त्यानंतर महिना उलटून देखील कंपनी टाळाटाळ करत असल्याने संदेश पुन्हा उपोषणाला बसला आहे.
Be First to Comment