Press "Enter" to skip to content

अभिमानास्पद : रायगडच्या सुकन्येचा जगभर बोलबाला…!

पनवेलच्या विहीघर येथील पूजा हरड-म्हात्रे यांनी बनविले भारतातील पहिले ऑटोमेशन ऍप्लिकेशन..! 🔷🔶🔷🔶

परदेशी कंपन्याना देणार टक्कर : नवी मुंबई, ठाणे व रायगड स्मार्ट सिटी व डेटा सेंटर पार्कसाठी वरदान 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔶🔷

डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि ऑटोमेशन या क्षेत्रात आतापर्यंत पाश्चात्य कंपनीची  मक्तेदारी होती. (Honeywell, Schneider, Siemens, Rockwell) यासारख्या दिग्गज कंपन्या आपले ऑटोमेशन भारतात महागड्या भावाने विकत होते. पण आता या शर्यतीत पहिली संपूर्ण भारतीय कंपनी पुढे आली आहे. आणि हि कमाल केली आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विहिघर येथील 27 वर्षीय पूजा हरड-म्हात्रे या अभियंतीने. या कर्तबगारीने जीचा बोलबाला आता जगभर सुरू झालाय. 

     पूजा यांचे 10 वी पर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमात पनवेल तालुक्यातील विहिघर येथे झाले आहे. तर पनवेलच्या सीकेटी कॉलेजमधून माहिती तंत्रज्ञान विषयातून पदवी मिळविली आहे. अवघ्या सहा महिन्यात पूजा यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे ऍप्लिकेशन बनवले आहे. या अप्लिकेशन चे नाव Nucleus हे आहे. आणि Neutron Automation या कंपनीच्या अखत्यारीत या अप्लिकेशनची निर्मिती झाली असून त्याचे ट्रेडमार्क अमेरीकेत ऍरिझोना येथे पूजा यांच्याच नावे आहे.  

     पूजा यांनी सांगितले की Nucleus अँप्लिकेशन चे यश इथपर्यंत थांबत नाही तर, Nucleus ला CDAC, IIT Hyderabad, Bharat Super Computing यांच्याकडून ऑटोमेशनच्या निविदा भरण्यासाठी आवश्यक अटींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 

  आदित्य बिर्ला, ICAR, DELHI या दोन्ही देटा सेंटर मध्ये Nucleus ने यशस्वी कार्य पूर्ण केले आहे. पूजा यांनी नासा वैज्ञानिक व मूळचे अलिबाग तालुक्यातील शहापूर येथील प्रणित पाटील यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली या अँप्लिकेशनवर संशोधन पूर्ण केले आहे.

आता भारताकडे स्थानिक स्मार्ट सिटी व डेटा अप्लिकेशन असल्याने यापुढे पाश्चात्य कंपन्यांवर असलेले अवलंबत्व संपुष्टात येऊ शकतील. Nucleus ने फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे सुद्धा शिर  उंचावले आहे.

पूजा हरड-म्हात्रे, ऑटोमेशन अप्लिकेशन निर्मात्या.
     उज्वल पर्याय

नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथे होणाऱ्या स्मार्ट सिटी व डेटा सेंटर पार्क मध्ये Nucleus तसेच इतर ऑटोमेशन अँप्लिकेशन महत्वाची जबाबदारी सांभाळतील. आगामी काळात रायगड, नवी मुंबई व ठाणेमधील विद्यार्थ्यांनी ऑटोमेशन सेक्टर एक उज्वल पर्याय म्हणून पाहणे गरजेचे आहे. तसेच रायगडची स्मार्ट कन्या पूजा अश्या विद्यार्थांना मार्गदर्शन देण्यास कटिबद्ध आहे. असे नासा वैज्ञानिक प्रणित पाटील यांनी  सांगितले.

काय आहे ऑटोमेशन आणि त्याचे उपयोग 

स्मार्ट शहर किंवा डेटा सेंटर अथवा सिटी मधील वीज सेवा, वातानुकूलित यंत्रणा, अग्निशमन सेवा,  पाणी पुरवठा, प्रवेश यंत्रणा, ट्राफिक सिग्नल आणि व्यवस्था, सर्व स्ट्रीट लाईट, तसेच इतर आवश्यक व अत्यावश्यक सेवा या केंद्रीय अँप्लिकेशन चा वापर करून स्वयंचलित करता येतात. तसेच त्यावर देखरेख व संपूर्ण माहिती सहित नियंत्रण ठेवता येते. आणि महत्वाचे म्हणजे या अँप्लिकेशन च्या विडिओ ऍनालिटिक्सद्वारे पोलिसिंग सुद्धा सोपी  झाली आहे.

   

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.