आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यशाळेत कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी तर्फे कायदा या विषयात मिळवली पीएचडी 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । मुंबई । 🔶🔶🔷🔷
मुंबई येथे सध्या कार्यरत असलेले सरकारी वकील गोपीचंद खाडे यांना नुकतेच हरियाणा येथिल होटल रेडिसन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यशाळेत कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी तर्फे कायदा या विषयात त्यांना पीएचडी (मानद डॉक्टरेट ) ही पदवी बहाल करण्यात आली आहे. ही पदवी प्राप्त करणारे गोपिचंद खाडे हे महाराष्ट्रातील पहिले सरकारी वकील ठरले आहेत.
खाडे यांना यापूर्वी न्यायवैद्यक शास्त्र तज्ञ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. अपराध शास्त्र आणि तांत्रिक तपास या विषयावर खाडे यांनी महाराष्ट्रातील सुमारे दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले आहे.
अभ्यासू वकिल म्हणून खाडे यांचा सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.








Be First to Comment