Press "Enter" to skip to content

करंजा मच्छीमार बंदरासाठी माती कुठून आणली ? रॉयल्टी भरली का ?


ठेकेदार व अधिकारीवर्ग मालामाल नामदार महाशय याची चौकशी करतील का ? 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । 🔷🔶🔷

मत्स्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच करंजा मच्छीमार बदरांची पहाणी केली असता त्यांनी ठेकेदाराची झाडाझडती घेतली आहे. परंतु सदर बदरांची जागा चुकीची असून त्यासाठी भराव करताना चिखलाचा वापर तसेच सदरची माती ही कुठून आणली व त्याची रॉयल्टी भरली का ? तसेच सदर बदरांसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही याची नामदार अब्दुल सत्तार त्यांनी सखोल चौकशी केली तर नक्कीच ठेकेदारासह अधिकारी वर्गाचा आर्थिक घोटाळा बाहेर पडेल अशी चर्चा करंजा ग्रामस्थांत सुरू आहे.

उरण तालुक्यातील करंजा येथे केंद्र व राज्य शासन यांच्या माध्यमातून बदरांचे काम 2019 पासून सुरू करण्यात आले आहे. एकूण 152 कोटी रुपये खर्च करून बंदराचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. याच्या तक्रारी झाल्यानंतर त्याची पहाणी करण्यासाठी बंदर व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पहाणी करण्यासाठी करंजा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ठेकेदारासह अधिकारी वर्गाची झाडाझडती घेत काम चांगल्या प्रतीचे करण्यास सांगितले.

यावेळी पहिला टप्पा येत्या जानेवारी पर्यंत तर बंदराचे काम एप्रिल पर्यंत पूर्ण होईल असा विश्‍वास व्यक्त ठेकेदारांनी व्यक्त केला आहे. परंतु सदर बदरांच्या उभारणीची जागा चुकीची असून या ठिकाणी गाळ साचून बोटी लावण्यास अडचण भासेल असे दावा मच्छीमार बांधव करतात. तसेच या बंदरासाठी माती ऐवजी चिखलाचा वापर जास्त करण्यात आला असून जो काही मातीचा भराव करण्यात आलेला आहे. ती माती कुठून आणली व त्याची रॉयल्टी भरली आहे का ? हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

सदरची माती ही अंधार्‍या रात्री सिडकोच्या जागेतून चोरी करून आणल्याचे ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे. मुसळधार पडणार्‍या पावसात दोन वेळा माती वाहून गेल्याचे समजते. त्याचप्रमाणे या बंदरावर जाण्यायेण्यासाठी लागणार्‍या रस्त्याची सुविधाही उपलब्ध झालेली नाही.

सदर बंदराचे काम गेली 2 वर्षे सुरू असूनही अद्याप बरेच काम बाकी असताना व काम ही निकृष्ट दर्जाचे असूनही याबाबत संबंधित खात्याचे अधिकारी वर्ग व मच्छीमार बांधवांच्या संघटनाही मूग गिळून असल्याने मच्छीमार बांधवांत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तरीही मंत्री महोदय पहाणी करण्यासाठी करंजा येथे आले असता ठेकेदार येत्या जानेवारी महिन्यात पहिला टप्पा सुरू होऊन बंदराचे काम एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण होईल असा दावा गेला आहे. परंतु सदर बंदराचे काम पूर्ण होण्यास अजून बराच कालावधी लागेल असे बोलले जात आहे.

तरी संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी याची सखोल चौकशी केली तर नक्कीच मोठा घोटाळा उघडकीस येऊन त्यामध्ये ठेकेदारासह अधिकारी वर्गाचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पितळ उघड होईल. तरी याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.