Press "Enter" to skip to content

बाधित शेतकऱ्यांना, व्यवसायिकांना कोणाताही मोबदला न देता अतिक्रमण

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मुल्यांकानुसार मोबदला द्या ; अन्यथा संघर्ष समितीचे तिव्र आंदोलन 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶

राष्ट्रीय महामार्ग 88 च्या पेण- खोपोली रस्त्यावरील विस्तारीत रुंदीकरणाचे काम जोरात सुरू असून बाधित शेतकऱ्यांना तसेच व्यवसायिकांना कोणाताही मोबदला न देता अतिक्रमण करीत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मुल्यांकानुसार मोबदला न दिल्यास येत्या आठ दिवसांत पेण खोपोली रस्ताबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन त्यांनी आ.रविशेठ पाटील यांना दिले आहे.

पेण- खोपोली महामार्गावरील पेण हद्दितील गणपतीची वाडी,आंबेगाव, धामणी, सापोली मांगरुळ, कामार्ली वाक्रुळ, गागोदे बु., आराव,हेमडी तर खालापूर तालुक्यातील रानसई,शिरवली, वावोशी फाटा, गोरठण बु. होराळे, आजिवली, आपटी, डोणवत, खिरकंडी, तांबाटी, वडवळ या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच घर, दुकाने या रस्त्याला जात असतांना तसेच बाधित शेतकरी आणि मागिल 30 ते 40 वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या व्यवसायिकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे रस्त्याच्या विकासाला शेतकऱ्यांचा विरोध नसुन बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना व व्यवसायिकांना सध्याच्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे 5 पट मोबदला देण्यात यावा अन्यथा येत्या आठ दिवसांत पेण- खोपोली रस्ताबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांसह आ. रविशेठ पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

यावेळी संघर्ष समितीचे पेण तालुकाध्यक्ष रमेश वनगे, खालापूर तालुकाध्यक्ष शशिकांत मोरे, उपाध्यक्ष विजय घोडिंदे, सुनिल झेमसे, रमाकांत पाटील, संतोष चंदने ,संदिप मोरे, प्रमोद जाधव, विलास काकडे, उमेश पाटील आदि उपस्थित होते.

शासनाने विकासकाम करीतांना बाधित शेतकरी यांना योग्य तो मोबदला दिला पाहिजे त्यामुळे या शेतक-यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभे असून याकरीता आपण विधिमंडळात आवाज उठवणार आहोत


रविशेठ पाटील आमदार पेण विधानसभा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.