सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
यावर्षीच्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आॅक्टोबर महिना संपतानाही पावसाचे धुमशान सुरूच होते. पंरतु एक ते दोन दिवसांपासुन सर्वत्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतक-यांची भातकापणीची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतातील सर्व भाताची रोपे जमिनीवर आडवी पडुन सर्वत्र विखुरल्यामुळे भातकापणी करतांना अक्षरश: मजुरांचा कंबरडा मोडत आहे. भातकापणीस शेतामध्ये पुन्हा नव्याने उगविलेले भाताचे कोंब हे देखील भात कापणीत अडथळे ठरत आहेत. ज्या ठिकाणी भातकापणीला दोन ते तीन दिवस लागायचे त्या ठिकाणची भात कापणी करण्यासाठी ८ ते ९ दिवस लागत आहेत. त्यातच भातकापणीसाठी लागणा-या मजुरांचीही मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. बहुतांशी आदिवासी मजुर हे दरवर्षी आपापल्या शेतीची कामे पुर्ण करुन दुसरीकडे मजुरी करण्यासाठी जात असतात.
पंरतु यावर्षी मात्र उशिरापर्यंत सुरु राहीलेल्या पावसामुळे भातकापणीची कामे ही सर्वांची एकदाच निघाल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे . आणि त्यातुनच जरी मजुरकर मिळाले तरी ४०० ते ४५० रुपये एका माणसाची मजुरी, दोन वेळचे जेवण, व चहापाण्यासाठी वेगळे पैसे असा मोठ्या प्रमाणात खर्च मजुरांवर करावा लागत आहे.
त्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारे महाग बी – बियाणे , मजुरकरांचा खर्च, व अवकाळी पावसाचा बसलेला फटका अशा सर्व गोष्टींचा विचार करता यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतक-यांपुढे पडला आहे.







Be First to Comment