नुकसान भरपाई मिळावी जेष्ठ नागरिक रामचंद्र जाधव यांची मागणी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
गेली अनेक वर्षांपासून कोलाड महिसदरा नदीला गोवे येथे पडलेल्या खांडीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे धरण शेतकऱ्यांच्या उशाशी मात्र शेतकरी उपाशी असल्याचे दिसून येत आहे या गोष्टीला केवळ पाठबंधारेच जबाबदार असल्याची माहिती शेतकरी व जेष्ठ ननागरिक सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी समाजोन्नती संघाचे सन्मवयक रामचंद्र जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा हायवे जवळुन वाहणाऱ्या महिसदरा नदीला मागील दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पुरामुळे पडलेल्या मोठ-मोठया खांडीमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असल्याने कोलाड पाठबंधारे खात्याकडे गोवे ग्रामस्थ शेतकरी वर्ग तसेच ग्राम पंचायतीच्या वतीने या मोठ्या पडलेल्या खांडीमुळे अनेक शेकऱ्यांच्या भात पिकांचे पिकांचे खरिब हंगामी आणि रब्बी हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे तसेच नवा गावठाण येथील ग्रामस्थांच्या रहदारीचा रस्ता देखील वाहून गेला आहे .अनेकदा याबाबत याची पाठबंधारे खात्याने दखल घ्यावी यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केले आहे अशी माहिती रामचंद्र जाधव यांनी लेखी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .
२०२० चा पावसाळा सुरु होण्यास काही दिवस शिल्लक असतांना ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या मार्फत पुन्हा या नदीचे ना दुरुस्त झालेले साईडचे बांधारे व पडलेल्या खांडी दुरुस्तीसाठी लेखी पत्रक देऊन मागणी केली होती परंतु यावर पाठबंधारे खात्याकडून आजतागत कोणतीही कार्यवाही केली नाही अथवा दुरुस्ती ही केली नसल्याने सदरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने आज जागोजागी अनेक खांडी जाऊन गावाकडे येणारा मार्ग हा पूर्णतः वाहून गेला असल्याचा उल्लेख या पत्रकात केला असून मागील दोनवर्षं परिसरातील शेतकरी यांचा खूप मोठा नुकसान झाला असून याची दुरुस्ती व सदरील शेतकऱ्यांची पिकाची नुकसानभरपाई पाठबंधारे खात्याकडून देण्यात यावी अशी मागणी असल्याचे सांगितले आहे .
आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा कामाचा पत्ता नाही.याकडे कोलाड पाटबंधारे विभागकडुन दुर्लक्ष केले जात असल्याने या अडमुठेपणाच्या धोरणांचा शेतकऱ्यांकडुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
महिसदरा नदी ही पुई, पुगाव, गोवे,मुठवली,या गावाच्या हद्दीतून जात असुन या हद्दीत पुराच्या पाण्यामुळे या नदीला जागोजागी प्रचंड खांडी पडुन ४ किमी अंतरावरील नदीचा भराव वाहून गेला आहे.त्यामुळे गेल्या वर्षी मोठया प्रमाणावर पडलेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते.याविषयी अनेकवेळा कोलाड पाटबंधारे विभागाकडे लेखी तक्रारी केल्या असता आश्वासनाशिवाय कोणतेही उपाययोजना याठिकाणी झालेली नाही.
खा.सुनिल तटकरे,मा.विधान परिषद आमदार अनिल तटकरे,यांच्या प्रयत्नातून महिसदरानदीवर मुठवली हद्दीत १ कोटी रु.खर्च करुन धरण बांधण्यात आला.धरण बांधुन सात वर्षे पुर्ण झाली परंतू नदीवरील शेतीला पाणीपुरवठा गेट,मोऱ्या,पोटकालवे,त्यामधील गाळ जशास तसे आहे.त्यामुळे गेली २० वर्षा पासुन सुमारे ३५० एकरातील शेतीला उन्हाळी पाणी पुरवठा होत नसल्याने शेतकरी वर्गाला दरवर्षी मोठया प्रमाणावर नुकसान सोसावे लागत आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या धरण उशाशी असून देखील शेतकऱ्यांना उपाशी राहण्याची वेळ आज निर्माण झाली आहे . तर पावसाळ्यात नदीला खांडी गेल्याने पीक वाया जात असल्याने नुकसान सोसावे लागत आहे त्यामुळे या गोष्टींकडे कोणी गांभीर्यपूर्वक याची दखल घेईन का असा सवाल उठत आहे,
तरी संबंधित पाठबंधारे खात्याकडून याची दखल घेऊन योग्य ती भरपाई संबंधित शेतकरी वर्गाला मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.








Be First to Comment