रस्त्याचे काम करण्यास विलंब का ? प्रवासी वर्गाचा खडा सवाल ! 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता रस्त्यावर प्रचंड धुरळा पडलेला असुन या धुरळ्याला पर्याय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर वाकण ते नागोठणे दरम्यान पाण्याची फवारणी केली जात आहे परंतु रस्त्याच्या कामाला विलंब का ? असा खड़ा सवाल प्रवासी वर्गाकडून केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील, कोलाड, खांब,सुकेळी, वाकण, नागोठणे दरम्यान रस्त्याला पावसात पडलेले खड्डे व धुरळा यामुळे मार्गावरून प्रवास करतांना प्रवासी वर्गाची तारांबळ उडत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली दहा वर्षापासूून सुरू या कामात कोणतीही प्रगती नाही परंतु या मार्गावर पडलेला धुरळा यालाा पर्याय म्हणून या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे . परंतु पावसाळा संपून उन्हाळा सुरू झाला आता रस्त्याचे काम करण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. या रस्त्यावर पसरलेला धुरळा याला पर्याय म्हणून पाणी फवारणी करून जणू टाईमपास चाललेला आहे असे दिसून येत आहेे.
मुबंई-गोवा हायवेवरील ब्रिटिशकाळातील बनविलेले जुने शिंगल रस्ते अनेक वर्षांपासून उखडलेले नाहीत परंतुु या महामार्गावरील चौपदरी करणात बनविण्यात आणलेले रस्ते दोन महिन्यानंतर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असुन प्रवासी वर्गाच्या जिवाचा जणू खेळ मांडला आहे तर काही ठिकाणी खड्डे बुजवताना खडी मिश्रीत माती टाकलेली आहे. या खडी मिश्रित मातीचे धुळीत रूपांतर झाले या धुळीला कितीही पाणी मारला तरी ही धूळ दहा मिनिटात कोरडी पडत आहे .हि धूळ मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या व्यवसायिकांच्या दुकानात पसरून मोठे नुकसान होते.शिवाय हि धुळ या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाच्या अंगावर उडत आहे.यामुळे ही धुळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी,खोकला,व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.तर हि धुळ डोळ्यात जाऊन अपघात धोका निर्माण होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटत असतांना या महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले परंतुु दहा वर्षे उलटून गेली तरी या महामार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतील याची खात्री देता येत नाही.यामुळे चिखल,खड्डे,धूळ यापासुन सुटका होण्यासाठी फक्त पाणी फवारणी करणे हा पर्याय नाही त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण करण्याकरता संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातुन केली जात आहे.








Be First to Comment