ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच तुषार मानकवळे यांनी राजकीयदृष्ट्या बदल घडवले : आमदार महेंद्रशेठ दळवी
सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रशांत पोतदार । 🔷🔶🔷
आंबेघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकीय दृष्ट्या बदल घडवून सरपंच तुषार मानकवळे याने शिवसेनेचा भगवा या ग्रामपंचायतीवर फडकवला आहे.यापुढेही पूर्व विभागात शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी शिवसेना पक्षाची संपूर्ण ताकद तुमच्या पाठी आहे असे प्रतिपादन अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पेण येथील कार्यक्रमा प्रसंगी केले.
आंबेघर येथे आज शुद्ध पाणीपुरवठा व विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी बोलत होते. यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी,उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, अलिबाग शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी, पेण शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला प्रमुख दीपश्री पोटफोडे, सरपंच तुषार मानकवळे आदी मान्यवर तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सरपंच तुषार मानकवळे यांनी अल्पावधीतच केलेल्या विकासकामांचे कौतुक केले तसेच विकास काम करताना डगमगून न जाता ती सर्वसामान्य जनतेच्या हिताची असणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, ग्रामपंचायत ,पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकुन भगवा फडकवायचा आहे,सरकार आपले असल्याने निधीची कमतरता पडणार नाही पुढील काळ हा निश्चित चांगला असेल संघटनेच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार यावे त्यासाठी त्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास गावाचा विकास निश्चितच होईल तसेच या विकास कामामुळे पुढेही ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता येईल असे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सांगितले

तर यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड यांनी सांगितले की येथे असलेली पूर्वापार एका पक्षाची सत्ता शिवसेनेने उलथवून लावली आहे. यापुढेही पूर्व विभागात तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकेल असे गावंड यांनी सांगितले तर येथे निधी उपलब्ध होत नसल्याने जास्तीत जास्त निधी मिळावे यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले गणपती वाडी येथील कार्यक्रमात तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी आपले मनोगत मांडले तसेच सरपंच तुषार मानकवळे यांनी सर्व उपस्थितांचे व सहकाऱ्यांचे आभार मानले.








Be First to Comment