सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ही उरणकरांसाठी समाधानकारक गोष्ट आहे. आज दिवसभरात फक्त १ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर एकाला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाहीत.
आज नवरात्रोत्सव होऊन उद्या दसरा साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने आलेली आकडेवारी बद्दल समाधान व्यक्त करीत उरण कोरोनामुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह २०५०, उपचार करून बरे झालेले १८४७, उपचार घेणारे ९४, मयत १०९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज उरणमधील फक्त एक जण पॉझिटीव्ह आढळला आहे. तर उरणमधील एकाला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.आज कोणीही मयत नाही.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होत चालला आहे. तर उपचार घेऊन घरी परत येण्याची आकडेवारी बऱ्यापैकी आहे. यामुळे उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे.







Be First to Comment