खडसेंच्या कडे कुठले खाते? अजुन गुलदस्त्यात…
मुंबई | कृषीमंत्रीपद किंवा गृहनिर्माण मंत्रिपद खडसेंना देणार अशी चर्चा आहे. खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवलं जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती माहिती आहे.
एकनाथ खडसे यांना जितेंद्र आव्हाडांचं गृहनिर्माण खातं देणार असल्याची चर्चा असताना सध्या शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चर्चा सुरू आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं आहे. ते आपलं खातं देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवारांकडे गेल्याचं कळतंय.
खडसेंच्या योग्य सन्मानासाठी त्यांना कोणतं मंत्रिपद देता येईल वा कॅबिनेट दर्जावर त्यांना समाधान मानावं लागेल यावर आता राजकीय चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण अथवा शिवसेनेकडे असलेलं कृषी खातं देण्यावरून तडजोड केली जात असल्याचं समजत आहे. अवघा काही वेळ शिल्लक असताना अजूनही मंत्रिपद ‘फिक्स’ न झाल्याने खडसेंच्या प्रवेशावरून काहीसा संभ्रम निर्माण होत आहे.







Be First to Comment