सिटी बेल लाइव्ह । मुंबई । राकेश खराडे । 🔷🔶🔷
सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रासह देश होरपळून निघाला आहे. कोरोना पाश्र्वभूमीवर ठिकठिकाणी रुग्ण संख्या अधिक असल्याने अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत आहे. हाच धागा पकडून दगडी चाळ मुंबई येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने अखिल भारतीय सेनेच्यावतीने व आशाताई गवळी व नगरसेविका गीताताई गवळी यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली लोकोपयोगी कार्यात मानाचा तुरा रोवत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यात येथील स्थानिक रहिवाशांसह बाहेरून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून जनसेवेचा आदर्श पायंडा चालू ठेवला . सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत मोठ्या संख्येने रक्तादात्यांनी रक्तदान करून तिनशे बाटल्या जमा करण्याचा टप्पा गाठला गेला.
यावेळी बोलताना आशाताई गवळी यांनी मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून माता भवानी आमच्या हातून हे कार्य करून घेत आहे असे सांगितले.व भविष्यात सुद्धा राज्यभर जनहिताची कामे चालू ठेवण्याचा मानस आशाताई गवळी यांनी व्यक्त केला.







Be First to Comment