राज ठाकरे यांचा ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना इशारा
मुंबई – भारतात आगामी काळात देशांतर्गत पातळीवर ई-कॉमर्स वेगाने वाढणार आहे. ॲमेझॉन कंपनीने चार वर्षांपूर्वीही ई-कॉमर्स सुरुवात केलेली आहे. एवढेच नाही तर ई-कॉमर्सच्या माध्यमातून भारतातून होणारी निर्यात ही वाढली आहे. यातच सणांच्या उंबरठ्यावर मोठे सेल सुरू असतानाच दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांना सात दिवसाच्या आत जर त्यांनी त्यांच्या अॅप मध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.मनसे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट केले आहे की,’ ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी त्यांच्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तयार केलेल्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी मनसे कडून केली जात आहे.
आज मनसेकडून या दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयावर या मागणी साठी धडक दिली जाणार आहे. मुंबईतील बीकेसी येथील ऑफिसवर जात मनसेकडून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला गेला आहे.’
दरम्यान, सात दिवसाच्या आत जर त्यांनी त्यांच्या अॅप मध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेले दिला आहे.






Be First to Comment