Press "Enter" to skip to content

गेली “भरती” कुणीकडे?

आरोग्य विभागात हजारो पदे रिकामी

लाखो अर्ज यौन सुद्धा भरती प्रक्रिया ठप्प

सिटी बेल लाईव्ह/ मुंबई.

राज्यात गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लालफितीत अडकली असल्याने अपुर्ण संख्याबळात कर्मचा-यांना कोरोना सोबत दोन हात करावे लागत आहेत. सध्या राज्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांसह 29 हजारांहून पदे रिकामी आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्यांसोबत याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. मात्र भरती प्रक्रियेसाठी लाखो अर्ज आले असून देखील अनेक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया लांबली आहे.

सध्या सुमारे 29 हजारांहून आरोग्यसेवी कर्मचाऱ्यांची पदे भरणं गरजेचे होते. तर कोरोनाकाळासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 19 हजार 752 पदे तात्काळ भरण्याचा निर्णय झाला मात्र अजूनही 12,574 पदे भरलेली नसल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना काळात सरकारने नाईलाजाने कंत्राटी पद्धतीने काही पदं भरण्याचा प्रयत्न केला मात्र ही भरती तूतपूंजी आहे.

राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठ्या संख्येने रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले असून अतिदक्षता विभागात खाटा मिळणे हे एक आव्हान बनले आहे. मुंबई, पुणे, नाशिक सातारा कोल्हापूर सारख्या ठिकाणी रुग्ण वाढत असल्याने रुग्ण आणि रुग्णालयातील खाटांची संख्या याचे प्रमाण व्यस्त बनत असतानाच डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची हजारो पदे भरलीच जात नाहीत.

आरोग्य विभागात 29 हजारांहून जास्त पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाच्या अखत्यारीत 56,560 नियमित मंजूर पदे आहेत त्यापैकी 17,337 पदे गेल्या अनेक वर्षांत भरण्यात आलेली नाहीत. सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक यांची 850 पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यानिहाय रिक्त पदे

पुणे जिल्ह्यातील पुणे, सोलापूर आणि सातारासाठी 2479 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 911 रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1793 मंजूर पदे असून 923 पदे भरलेली नाहीत. ठाणे जिल्ह्यासाठी 1889 पदे मंजूर असून 1494 पदे भरली नाहीत. औरंगाबाद 2436 पदांपैकी 1461 रिक्त पदे तर नाशिक जिल्ह्यासाठी 2330 मंजूर पदे असताना 1165 पदे रिक्त आहेत.

सरकारसमोरील अडचणी

भरती प्रक्रियेसाठी लाखो अर्ज आलेले आहेत. मात्र निवडणूक आचार संहिता, सारथी पोर्टल, मराठा आरक्षण आणि सध्या कोरोना या अडचणी सरकारसमोर उभ्या ठाकल्या असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.