Press "Enter" to skip to content

हाथरस घटनेतील नराधमाना फाशीची शिक्षा द्या !

रिपांई (अ) गटाचे सुधागड तहसीलदाराना निवेदन !

सिटी बेल लाइव्ह । विनोद भोईर । पाली । 🔷🔶🔷

उत्तरप्रदेशातील हाथरस येथील अमानुष व मानवतेला काळिमा फासणार्‍या दुर्दैवी घटनेचा राज्य व देशभरात निषेध व्यक्त होत आहे. सुधागड तालुका रीपाई पक्षाने या घटनेचा जाहीर निषेध दर्शविला.

पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रिपाई आठवले गट सुधागड तालूका यांच्या वतीने पाली सुधागड तहसीलदारांना गुरुवार दि. (15) रोजी निवेदन सादर करून करण्यात आली.

रिपाई चे जिल्हा सचिव रविद्रनाथ ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष राहुल सोनावले, कार्याध्यक्ष भगवान शिंदे, युवा अध्यक्ष निशांत पवार, राहुल महाडिक, यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर घटनेचा निषेध दर्शविण्यात आला. सदर निवेदन तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी स्वीकारले.

हाथरस येथील घटनेने निर्भयाची पुनरावृत्ती झाली आहे. सदरचा खटला फास्ट ट्रेक कोर्ट, चालवावा, तसेच देशभरात युवती व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी रिपाइं च्या वतीने करण्यात आली. राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करून पीडित कुटुंबियांवर अन्याय केला. कुटुंबियांचा विरोध झुगारत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यामुळे पीडित कुटुंबियांच्या बाजूने संपूर्ण देश उभा राहिला असल्याचे यावेळी जिल्हा सचिव रविद्रनाथ ओव्हाळ यांनी म्हटले. यावेळी श्रेयेश भालेराव, राजद्रे भालेराव, बाबू सोनावले, सतीश गायकवाड , मिलिंद शिंदे, मुन्ना सोनावळे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.