सिटी बेल लाईव्ह/ मुंबई.
सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिध्द कंपन्या TCS, Infosys and Wipro आता पुन्हा मोठ्या संख्येने नोकरभरती करण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रभाव उतरल्याने बाजारतील मागणीत काही प्रमाणात वाढ झाल्याने या कंपन्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील 2-3 आठवड्यापासून उतरत आहे.
या तिन्ही कंपन्यांनी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या एकूण हेडकाउंटमध्ये अनुक्रमे वाढ झाल्याचे सांगितले आहे. हेडकाउंट वाढणे हे आयटी कंपन्यांच्या वाढीचे एक सकारात्मक निदर्शक मानले जाते. या तिन्ही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नतीही जाहीर केली आहे.
दुस-या तिमाहीतील या कंपन्यांची कमाई विश्लेषकांच्या वर्तवलेल्या अपेक्षेपेक्षा पुढे आहे.
कोरोनाकाळात TCS ने जवळपास 8 हजार फ्रेशर्सची भरती कंपनीत केली आहे. या भरतीची जवळपास सगळी प्रोसेस ऑनलाईनच झाली आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन कंपनीच्या दुस-या तिमाहीतील कमाईनंतर ही माहिती दिली आहे.
इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूबी प्रवीण राव यांनीही नवीन भरतीचे संकेत दिले आहेत. राव यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात नवीन लोकांची गरज आम्हाला भासणार आहे. मागील तिमाहीत इन्फोसिसमध्ये 5,500 जागा भरायच्या होत्या. त्यातील काही भरल्या आहेत. पुढील तिमाहीत जर कंपनीची चांगली वाढ झाली तर नोकरभरती होण्याची शक्यता आहे.






Be First to Comment