सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔶🔷🔶
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशारी जी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील ग्रामीण वृत्तपत्रे व संपादक पत्रकारांना कोरोना कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून विशेष आर्थिक सहकार्य मिळणे बाबत निवेदन सादर केले.
शिष्टमंडळात संघटनेचे प्रवक्ते, रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, संघटनेचे संस्था विश्वस्त तथा मंत्रालय फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष अरुण दत्तात्रय कुलकर्णी, भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष एस. एम .शेख ,डॉक्टर सिद्धार्थ पाटील ,संपादक नंदकिशोर धोत्रे यावेळी उपस्थित होते







Be First to Comment