Press "Enter" to skip to content

हाथरस घटनेचा सुधागड तालुका शेतकरी कामगार पक्षाकडून जाहीर निषेध

हाथरस घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या : सुधागड शेकापचे पाली तहसीलदारांना निवेदन 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

उत्तरप्रदेशातील हाथरस येथील अमानुष व मानवतेला काळिमा फासणाऱ्या दुर्दैवी घटनेचा राज्य व देशभरात निषेध व्यक्त होत आहे. सुधागड तालुका शेतकरी कामगार पक्षाने या घटनेचा जाहीर निषेध दर्शविला. 

पीडितेच्या कुटुंबियांना  न्याय देण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्ष सुधागड तालुका यांच्या वतीने पाली सुधागड तहसीलदारांना  निवेदन सादर करून करण्यात आली. शेकाप नेते सुरेशशेठ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका चिटणीस उत्तमराव देशमुख व राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर घटनेचा निषेध दर्शविण्यात आला.

सदर निवेदन नायब तहसीलदार वैशाली काकडे यांनी स्वीकारले.  हाथरस येथील घटनेने निर्भयाची पुनरावृत्ती झाली आहे. सदरचा खटला फास्ट ट्रेक कोर्ट, चालवावा, तसेच देशभरात युवती व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी शेकापच्या  वतीने करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज सुरू असल्याचे प्रसार माध्यमाद्वारे दिसून आले.

पीडित कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका व मानसिकता येथील सरकारची दिसत नाही, हे प्रकरण ज्या संवेदनशील व मानवतेच्या पद्धतीने हाताळणे गरजेचे होते तशी कोणतीही कृती सुरवातीपासून पहायला मिळाली नाही. राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करून पीडित कुटुंबियांवर अन्याय केला. कुटुंबियांचा विरोध झुगारत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

त्यामुळे पीडित कुटुंबियांच्या बाजूने संपूर्ण देश उभा राहिला असल्याचे शेकापने म्हटले. यावेळी शेकाप तालुका चिटणीस उत्तमराव देशमुख, राजेंद्र राऊत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष किसनराव उमठे, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपतराव सितापराव, पंचायत समिती सदस्य सौ.सविता हंबीर, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार,जानु हंबीर, सुधीर साखरले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.