सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुण मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून त्या मुलीची जीभ तोडली, तिचा पाठीचा कणा मोडला, तिला रक्तबंबाळ केले. या पाशवी आत्याचारामुळे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमध्ये तेथील प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप प्रणीत राज्य सरकारचा देशभरातून निषेध नोंदवला गेला.
या पिडीत मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आलेले, आंदोलने झाली. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत मध्ये गुरूवारी सायंकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर कर्जतमधील आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने या पीडित मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुनील गायकवाड, दीपक भालेराव, अॅड. कैलास मोरे, राहुल डाळींबकर यांनी आपल्या भाषणांमधून उत्तर प्रदेश मधील भाजप प्रणीत सरकारचा जाहीर निषेध केला. बलात्कार करणाऱ्या नराधमाना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत या पीडित मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन चालू ठेवावे लागेल अशा भावना सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचे विविध पक्ष,संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स च्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शनचे काम विद्यानंद ओव्हाळ त्यांनी केले.








Be First to Comment