Press "Enter" to skip to content

पार्क साईट विक्रोळी येथे अन्नधान्य किट व मास्कचे वाटप

पंचरत्न मित्र मंडळ चेंबुर व गायत्री परिवार महिला मंडळ आनुशक्ती नगर चेंबुरतर्फे उपक्रम सुरू 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । विक्रोळी । सुनिल ठाकूर । 🔷🔶🔷  

सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे. 
         

 सद्यस्थितीत  जगामध्ये सध्या कोविड-१९ म्हणजेच करोना या माहामारीने थैमान घातले आहे. अशा परीस्थितीमध्येही पंचरत्न मित्र मंडळ आर सी एफ चेंबुर व गायत्री परिवार महिला मंडळ अनुशक्ती नगर,चेंबुर यांनी समाजसेवेचे शिवधनुष्य समर्थपणे उचलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अग्रसेन विद्यालय,पार्क साईट, विक्रोळी(प),मुंबईसह वर्षा नगर येथे १०० अन्नधान्य किटसह मास्कचे वाटप करण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर , सचिव  प्रदीप गावंड व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे गायत्री परिवार महिला मंडळ अनुशक्ती नगर,चेंबुर व अन्य देणगीदार,शुभचिंतक तसेच आर.सी. एफ प्रशासन यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.शंकर मेणे यांनी सुत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन सोनू शिवगन यांनी केले.आत्माराम बाईत यांनी हा अन्नधान्य वाटप कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले.

सचिन साळुंखे,हनुमंता चव्हाण(पिंकू), प्रितेश पाटील, जालिंदर इंगोले, सांदिप संदीप,दिपेश पाटील,डि.निंबाळकर, अमिष (बंटी) भोईर,बाळकृष्ण पोलाई व मंडळाचे इतर कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यापुढेही पंचरत्न मित्र मंडळ,गायत्री परिवार महिला मंडळ अनुशक्ती नगर असेच समाजहिताचे कार्यक्रम राबणार असल्याचे मत मंडळ अध्यक्ष अशोक भोईर तसेच स्नेहा नानिवडेकर यांनी व्यक्त केले. 

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.