Press "Enter" to skip to content

शिवसेनेचे उरणमध्ये महारक्तदान शिबिर, 150 जणांनी केलं रक्तदान

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उरण तालुक्यातील शिवसेना युवासेना नवघर चिरनेर जासई विभागाच्या वतीने सद्गुरू चॅरिटेबल ब्लड बँक कोपरखैरणे यांच्या सहयोगाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

जे एन पी टी वसाहतीत भरवलेल्या या शिबीरात 150 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले.

तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शिबिराला जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत, कामगार नेते महादेव घरत, गणेश म्हात्रे,गणेश घरत, रुपेश पाटील, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, अमित भगत, गणेश घरत, कृष्णा घरत,(उप.ता.संघटक). विभाग प्रमुख संदेश पाटील, भूषण ठाकूर, विश्वास तांडेल, शिक्षकसेनेचे कौशिक ठाकूर युवासेनेचे निशांत घरत, सुदीप ठाकूर,वेश्वी सरपंच संदीप कातकरी .श्री रविंद्र पाटील (शाखा प्रमुख वेश्वी) .नारायण तांडेल (शाखा प्रमुख सोनारी ).जगजिवन भोईर(शाखा प्रमुख द्रोणागिरी) .आकाश पाटील, सचीन पाटील, सुमित ठाकूर, प्रज्वल पाटील यांच्यासह.क्च्छ युवा संघ नवी मुंबई चे राहुल देढीया(महामंत्री ).राजेश जैन (संयोजक नवी मुंबई ).शास्त्री जी (107वेळा रक्तदान करणारे ).चंद्रकांत देढीया.निलेश मोर्बिया.अंबर जैन.जयंतीलाल छेड़ा.समरजित यादव सह अनेकांनी उपस्थिती दर्शवली.

देशभरात कोरोनाचे संक्रमण होत असताना अनेक रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा होत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले होते. मागील वर्षभरात माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विधानसभा मतदारसंघात 1200 हुन अधिक रक्तपिशव्या संकलित केल्या होत्या. आता या मोहिमेला पुन्हा नव्याने सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात उरण तालुक्यात दोन रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

रविवारी ता. 17 रोजी चाणजे तसेच उरण शहर विभाग आणि उरण विधानसभा मतदारसंघात 10 रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती माजी आमदार आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.