Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज ८ कोरोना पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ८ जण सापडले आहेत. आज उपचार करून ५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह २०२०, उपचार करून बरे झालेले १८१२ उपचार घेणारे १०४, मयत १०४ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज श्री सागर अपार्टमेंट मोरा रोड १, जेएनपीटी २, सिद्धी विनायक अपार्टमेंट १, मुळेखंड १, नेव्हल स्टेशन करंजा १, बोकडविरा १, सोनारी १ असे एकूण ८ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर करंजा नवापाडा १, खोपटे १, ओमकार कॉलनी २, वाणी आळी १ असे एकूण ५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होत असल्याने उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु आता नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये सावधानता बाळगावी अन्यथा कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.