Press "Enter" to skip to content

परळी येथील बौद्धचार्य के. टी.गायकवाड यांच्या पत्नी कविता यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशील सावंत) 🔷🔶🔶🔷

सुधागड तालुक्यातील परळी येथील बौद्धचार्य के. टी. गायकवाड यांच्या पत्नी कविता गायकवाड (वय 62) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्या  अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या  होत्या. सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात त्या सातत्याने सहभागी होत. आपल्या घरी आलेल्या प्रत्येकाला आदर व मानसन्मान देण्यात त्यांचा हातखंडा होता. अडीअडचणीत सापडलेल्या व्यक्तीला त्यांची मदत मिळायची, शिवाय तहानलेल्या भुकेलेल्या जीवाला अन्नपाणी देऊन त्यांच्याकडून परोपकारी सेवा घडे. आपल्यामुळे कुणी दुखावणार नाही याची त्या काळजी घेत, त्या नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असत. 

त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. तसेच भीमशक्ती मित्रमंडळ व मातोश्री रमाबाई महिला मंडळ, भीमनगर परळी यांच्याकडून देखील आदरांजली वाहण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.