Press "Enter" to skip to content

अॉनलाईन शाळा..

अॉनलाईन शाळा..

शिक्षकांशिवाय विद्यार्थी व विद्यार्थ्यांशिवाय शाळा असूच शकत नाही…!!
पण या कोरोना च्या कठीण परिस्थितीत शाळा सुरू होणे शक्य नसले तरीही डिजीटल शिक्षण पद्धतीने ऑनलाईन शाळा सुरू केली आहे. पण हे कितपत योग्य वाटते, ज्या चिमुकल्यांना अजून स्वत:चे नाकही पुसता येत नाही, त्या चिमुकल्यांना घरात screen समोर बसून शिक्षण देणे,कितपत योग्य आहे.खरं म्हणजे घरातील वातावरण शाळेसारखे असूच शकत नाही.
त्यांचे खेळायचे बागडायचे वय आहे, मला तर हे अजिबात पटत नाहिये..! एवढे वर्ष अभ्यास नाही केला तर काय बिघडले ! मग द्या न त्या बाळांना वेळ..जाणून घ्या त्यांच्या आवडीनिवडी , खरचं एवढी आवश्यकता आहे अभ्यासाची ? त्या चिमुकल्यांना शाळेतील एकुण गजबजलेले वातावरण ,प्रत्यक्षपणे रागावणारी,आणि जवळ घेऊन लाड करणारी, प्रत्यक्ष शिकवत असलेली, वर्ग शिक्षिका दिसत नाही..मित्रांशी भांडण,मारामारी, खेळणं , रडणं, व हसून एकत्र डबा खाणे नाही…!! बरं मुले किती वेळ शांत बसून मोबाईलवर अभ्यास करतील , त्यांना screen वर गणित विषयातील बेसिक कसे पक्के होणार ! नाही समजले तर विचारणार कसे ! लहान मुले अभ्यासावर असे कितीवेळ लक्ष केंद्रित करणार ! मध्येच खेळायचा मुड आला तर, त्यात नेटवर्कचा प्रोब्लेम आहेच. मला आठवते की, मागच्या पिढीला मुले 6 वर्षांची झाल्यावरच शाळेत प्रवेश घेतला जात होता. मुलांनी मनसोक्त खेळावं, मातीत लोळाव..गवतात पळाव..असे दिवस होते.
पण हल्ली बाळं दोन वर्षाचे झाले कि, त्याला प्ले ग्रुपला कधी अॅडमिशन घेवू..अशी मानसिकता आजकालच्या पालकांची झाली आहे.त्यामुळे मुलांच बालपण हरवत चालले आहे. Outdoor games बंद झाले आहेत. बरं पालक एवढ्यावरच थांबत नाही बरं! मी म्हणते आपण आपल्या लहानपणी किती खेळायचो, बिनधास्त पणे ! मग कशाला अॉनलाईन शाळा, व क्लास लावून या चिमुकल्यांवर हा अन्याय ! या परिस्थितीत अभ्यासा व्यतिरिक्त काही कला जोपासल्या तर नाही का चालणार? मुलांमध्ये ६४ कलांगुणांपैकी काही कला मुलांमध्ये नक्कीच दडलेल्या असतात. मग एवढे वर्ष
प्रत्येक मुलातील कौशल्य समजून घेणे. जसे चित्रकला, अभिनय, संवाद कौशल्य, लेखन, गायन, डान्सचे विविध प्रकार , चंद्र व ताऱ्यांचे कुतूहल मुलांना असतेच, मग त्याविषयी माहिती सांगणे , माती काम पेटींग अशा विविध प्रकारच्या गोष्टी अभ्यासक्रम म्हणून ठेवल्या तर मुले खुप आवडीने शिकतील. मूल्यशिक्षण व व्यवहारज्ञान पण खूप महत्त्वाचे आहे. मग यासाठी शाळेने एक वेळापत्रक आखून दिले तर मुलांमध्ये असणाऱ्या आवडी निवडी लक्षात येतील. भविष्यात त्यांना या गोष्टीचा फायदाच होईल. व अॉनलाईन अभ्यासाचा डोळ्यावर जो परिणाम होत आहे त्यापासून त्यांची सुटका होईल. बरोबर आहे कि नाही ? नंतर वातावरण सुरळीत झाले कि मग मुलांच्या नवीन समजलेल्या छंदाची नव्याने ओळख झालेली असतेच. मग त्यांना पुन्हा hobby class, ला घालता येईल. आणि आपल्या चिमुकल्यांचे स्वप्न साकार होईल, मोठे झाल्यावर त्यांचे पुढील उज्ज्वल भविष्य बघून आपल्या सारख्या समस्त पालकांचा उर आनंदाने व अभिमानाने नक्कीच भरुन येणार !! हो न ?

मानसी जोशी, खांदा कॉलनी
.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.