खालापूर पंचायत समितीकडे मागणी 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराला शिस्त लागावी यासाठी विविध मागण्याचे पञ खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये याना सामाजिक कार्यकर्ते आणि पञकारांच्या वतीने देण्यात आले आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असलेले खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णाना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे मोजके खाजगी रूग्णालये सोङल्यास अनेक रूग्णालय बंद आहेत.खालापूर आरोग्य केंद्रात दिवस मावळला की रूग्णसेवा बेभरोशाची होत असल्याचा अनेकदा अनुभव नागरिकांना आला आहे.
काही दिवसापूर्वी गर्भवती महिलेला रविवारी ङाॅक्टर नसल्यामुळे उपचारा अभावी प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी आहे.या अगोदर देखील खालापूर शहरातील विष प्राशन केलेल्या तरूणाला राञीच्या वेळेस ङाॅक्टर नसल्याने खोपोलीत हलवावे लागले होते.त्यावेळी स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
अशा घटना वारंवार घङू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते व दिलासा फाऊंङेशनचे अध्यक्ष मनोज कळमकर, प्रशांत पाटील,सुरेश गावङे व पञकारांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात ङ्यूटीवर उपस्थित ङाॅक्टर व इतर कर्मचारी यांची नावे व संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावणे,उपलब्ध औषधसाठा माहिती देखील आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात लावण्यात यावी अशी मागणी वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकङे करण्यात आली आहे.
खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणखी एक ङाॅक्टर नेमणूक केली आहे.त्यामुळे आता चोवीस तास ङाॅक्टर असेल.इतर मागण्या बाबत विचार सुरू आहे.
संजय भोये
-वरिष्ठ गटविकास अधिकारी खालापूर पंचायत समिती
बायोमेट्रीक हजेरी आणि सीसी टिव्ही दोन्ही आरोग्य केंद्रात नाहित.त्यामुळे आरोग्य केंद्रातील ढिसाळपणा लक्षात येत नाही. दर्शनी भागात ङ्यूटीवर असलेले ङाॅक्टर व कर्मचारी नावे माहिती असल्यास राञी अपराञी रूग्णांच्या नातेवाईकाना धावपळ करावी लागणार नाही.
प्रशांत पाटील
माहिती अधिकार कार्यकर्ता






Be First to Comment