राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हाध्यक्ष शिवदास कांबळे यांची मागणी 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 💠🌟💠🌟
कोव्हीड 19 रुग्णांना वैद्यकीय दृष्ट्या सक्षमपणे काळजी घेण्यासाठी पनवेल महापालिकेने मार्गदर्शन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष शिवदास कांबळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतर्गत कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून आपण स्वतः व वैद्यकीय कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने अहोरात्र झटून नागरिकांची सेवा करीत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद, अशा बाधित रुग्णांना आपल्या मार्फत घरी विलगीकरण केल्यानंतर आवश्यक ती माहिती दिली जात आहे तरीसुद्धा वैद्यकीयदृष्ट्या घ्यावयाची काळजी जर एखादी परिस्थिती तयार झाली तर त्यावर ती घरी करावयाचे उपाय तसेच इतर वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाची माहिती त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून एखादं माहितीपत्रक काढून आपल्या मार्फत कोव्हीड 19 बाधीत रुग्णांना दिले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे.






Be First to Comment