Press "Enter" to skip to content

पेण शहरातील विविध प्रश्नांना मनसेने फोडली वाचा

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब : मागण्यांची जलद पूर्तता न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा 🔶🔷🔶🔷

महानगर गॅस कंपनी व नगरपालिकेचे पेणमधील रस्त्यांकडे दुर्लक्ष : मनसेचा आक्रमक पवित्रा 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔶🔷🔷🔶

कोरोनाच्या जागतिक महामारीने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. त्यामुळे कोरोना संकटाने सारेच त्रस्त झालेत. सरकारने लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणली असताना, दैनंदिन जीवन जगत असताना पेण शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या प्रश्नांना जनतेला सामोरे जावे लागत आहे. पेण तालुक्यातील व शहरातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना मनसेने वाचा फोडली. जाब विचारला.

मनसेचे संदिपदादा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे पेण शहर अध्यक्ष नितीन पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांसह नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचून मागणीचे निवेदन दिले.मागण्यांची जलद पूर्तता न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

पेण शहरातील खड्डेमय रस्ते व काही महिन्यांपासून महानगर गॅस कंपनीने गॅस लाईनच्या नावे शहरातील ठिकाणी रस्ते खोदून गॅस लाईन टाकली त्यानंतर महानगर गॅस कंपनीने व नगरपालिकेने रस्त्यांबाबत काय केले ? पेण शहराला पाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारले परंतु उद्घाटनाच्या काही दिवसांपासूनच आजतागायत गढूळ व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.

कोरोनाच्या महामारीच्या काळात हा नागरिकांच्या जीवाशी खेळ कशासाठी चालला आहे ? शहरातील सांडपाण्याची तुंबलेली गटारे विनाकारण उघडी कशी काय? त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनधिकृतपणे रस्त्यालगत फुटपाथवर व रस्त्यावर फेरीवाल्यांची व्यापलेली उद्योगधंदे, अनधिकृत बांधकामे आणि मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती, शहरातील बाजारपेठेमध्ये वाढणार्‍या गर्दीवर नियोजन करिता ठोस उपाययोजना करण्याबाबत, पेण शहरात होणारी वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या, लवकरात लवकर जनतेला स्वच्छ आणि नियोजन बद्ध सुंदर शहर मिळावं यासाठी मनसेचे संदिपदादा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे पेण शहर अध्यक्ष नितीन पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांसह नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना निवेदन दिले आहे.

यावेळी त्यांच्यासह संदीपदादा ठाकूर, सपना देशमुख,शालोम पेणकर,गौतम मोरे,नागेश गावंड,अनिशा गावंड, छाया शिंदे,प्रविण म्हात्रे,अजिंक्य गावंड, प्रफुल्ल पाटील, समीर पाटील, राहुल म्हात्रे, गणेश पाटील, ज्ञानेश्वर ठाकूर, जयेंद्र डंगर, सचिन पाटील, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.