सिटी बेल लाइव्ह /पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या राधाबाई चिंतामणी गायकवाड यांचे दि.(30)रविवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या रूपाने चळवळीतील ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्त्या हरपल्या असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया कोकण नेते व्ही.के.जाधव यांनी दिली आहे.
राधाबाई गायकवाड अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात त्या सातत्याने सहभागी होत. आपल्या घरी आलेल्या प्रत्येकाला आदर व मानसन्मान देण्यात त्यांचा हातखंडा होता. अडीअडचणीत सापडलेल्या व्यक्तीला त्यांची मदत मिळायची, शिवाय तहानलेल्या भुकेलेल्या जीवाला अन्नपाणी देऊन त्यांच्याकडून परोपकारी सेवा घडे.प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांना शिकवले, त्यांच्यावर बहुजन महापुरुषांचे क्रांतिकारी, लढावू विचार, व आदर्श संस्कार बिंबवले. आज त्यांची मुले शैक्षणिक , सामाजिक , धार्मिक कार्यात अग्रेसर राहून काम करीत आहेत. नरेश गायकवाड हे आंबेडकरी व धम्मचळवळीत तनमनधनाने योगदान देत आहेत.
राधाबाई गायकवाड यांचा जलदानविधी व शोकसभा कार्यक्रम 10 सप्टेंबर 2020 रोजी खांब येथे होणार असल्याची माहिती गायकवाड कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पछात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.






Be First to Comment