सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔷🔶🔶🔷
गणेशोत्सवाचे ५९ वे वर्ष साजरे करीत असलेल्या के.एम.जी. विभाग सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ नागोठणे यांच्या मार्फत गेले अनेक वर्ष शिव व्याख्यान, होम मिनिस्टर, ऑर्केस्ट्रा, विविध गुणदर्शन, विदयार्थी गुणगौरव, पारंपरिक नाच असे अनेक सांस्कृतिक, धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यावर्षी कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे प्रत्यक्षरित्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला सर्वत्र बंदी लावण्यात आली आहे. मात्र असे असले तरी के.एम.जी. विभाग सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या व अखंड विश्वाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती श्रीमंत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुप्रसिद्ध शिव व्याख्यानकार सौरभदादा कर्डे यांच्याकडून सर्व ग्रामस्थ व शिवप्रेमींसाठी सादर करण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या ऑनलाइन व्याख्यानातून सौरभदादा कर्डे यांनी सर्व ग्रामस्थ व शिव भक्तांना घरच्या घरीच शिवव्यख्यानाचा आस्वाद करुन दिला आणि महाराज्यांचा इतिहास पुन्हा एकदा जागृत करण्याचे काम केले.
हे ऑनलाइन व्याख्यान यशस्वी करण्यासाठी के.एम.जी. विभाग सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नागोठणेकर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सभासदांनी सहकार्य केले.






Be First to Comment