Press "Enter" to skip to content

प्रातं कार्यालयाचे धान्य किटचे घरपोच वाटप

जांभूळवाडीतील 50 आदिवासी कुटुंबांना वाडीत जाऊन केले वाटप

सिटी बेल लाइव्ह / कर्जत – (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷


कर्जत खालापुर उपविभागीय महसूल आधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या पूढाकाराने कर्जत तालूक्यातील गरज असलेल्या आदिवासी कुटुंबांना धान्याची किट वाटपाची प्रक्रीया गतीमान झाली असुन तालुक्यातील जांभूळवाडी या कातकरी आदिवासी वाडी मध्ये घरपोच धान्यवाटप करण्यात आले.

कर्जत मधील दिशा केंद्र या सामाजिक संस्थेने गरज असलेल्या आदिवासी कुटुंबांना धान्य वाटपाची विनंती केली होती, या विनंती नुसार मुंबई येथील निती गोयल यांच्या लाला भगवानदास ट्रस्ट च्या सहकार्य ने कर्जत खालापुरच्या उपविभागीय महसुल आधिकारी वैशाली परदेशी -ठाकूर यांनी धान्य किट उपलब्ध करून घेतले व गरज असलेल्या कुटुंबांना ते वाटप करण्यास सुरुवात केली.

पहिल्या दिवसी तमनाथ कातकरवाडी, बिड व खाणीचीवाडी कातकरवाडी येथील एकशे पनास कुटुंबांना धान्य वाटप केल्यानंतर जांभूळवाडी येथील पनास कुटुंबांना घरपोच धान्यवाटप करण्यात आले.

पाच किलो गव्हाचे पिठ,पाच किलो तांदुळ, दोन किलो डाळ, एक किलो साखर, एक किलो तेल, साबण आदी वस्तू असलेल्या किटचे वाटप प्रातं कार्यालयाच्या वतीने मंडळ आधिकारी विशे, तलाठी खूशाल राठोड, दिशा केंद्राचे कार्यकर्ते रवी भोई, सूशिला भोई, भालीवडीचे रेशन दूकानदार प्रल्हाद कार्ले आदि च्या उपस्थितीत वाटप करण्यात आले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.