समाजाभिमुख सक्षम नेतृत्व हरपले..🔷🔶🔷🔶
रोहा (नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के) 💠🌟💠🌟
रोहे शहरातील श्री. संत शिरोमणी गोरोबा नगर दमखाडी( कुंभार आळी) येथील रोहा नगर परिषदेचे कर्तृत्वान नगरसेवक तथा माजी पाणी पुरवठा सभापती श्री.महेश कोलाटकर यांचे वडिल माजी नगरसेवक तथा जेष्ठ नागरिक कै.गोपीनाथ ना.कोलाटकर(आण्णा) यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे.
आण्णांनी नेहमीच सकारात्मक विचारसरणी मुळेच जीवनामध्ये हार न मानता सतत हसतमुख चेहऱ्याने सर्वांना सोबत घेत आडल्या नडल्याला मदतीचा हात पुढे करायचे ते अत्यंत प्रेमळ,शांत,मितभाषी,मनमिळावू,परोपकारी स्वभावाचे असल्याने रोहे शहरातील तसेच ग्रामीण भागामध्ये देखील विविध सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रातील त्यांची भरीव कामगिरी व उल्लेखनीय कार्य होती.समाजाभिमुख कार्यकर्त्याला सक्षम नेतृत्व हरपल्याने रोहा तालुका कुंभार समाज मुकला असून पोरके झाले आहे अश्या भावना उपस्थितांकडून ऐकायला मिळत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे, दोन मुली,जावई,नातवंडे, पतवांडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने कोलाटकर परिवारावर तसेच दमखाडी गावावर ऐन गणपती सणासुदीच्या दिवसांत दुःखाचे सावट पसरले असून डोंगर कोसळले आहे व मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.२९/०८/२०२० तर अंतिम धार्मिक विधी तेरावे मंगळवार दि.०१/०९/२०२० सकाळी १०:०० ते १२:०० च्या दरम्यान राहत्या घरी संत गोरोबा नगर दमखाडी येथील होतील..असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले..






Be First to Comment