Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज सापडले २० कोरोना पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह २० जण सापडले आहेत. फक्त एकालाच उपचार करून घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटीव्ह १३५४, उपचार करून बरे झालेले ११०७, उपचार घेणारे १८२, मयत ६५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज भानुशाली वाडी करंजा १, देऊळवाडी उरण १, चाणजे ३, पागोटे १, कुंभारवाडा ओमकार कॉलनी १, मोठी जुई १, सावरखार १, जेएनपीटी २, नवे नगर करंजा १, गौरीनंदन अपार्टमेंट चारफाटा १,स्टार कॉंप्लेक्स म्हातवली २, उरण पोलीस स्टेशन १, नयन अपार्टमेंट उरण १, सोनारी १, सीआयएसएफ उरण १, द्रोणागिरी १ असे एकूण २० जण पॉझिटीव्ह आले आहेत. तर फक्त दिघोडे येथील १ ला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढत चालला आहे. आज जरी कागदोपत्री २० पॉझिटीव्हचा आकडा तरी काहीजण घरीच राहून उपचार करणे पसंत करीत आहेत. आज उपचार करून फक्त एकजणच घरी परतला तर आज मयत कोणी झाले नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.