सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहा (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔷🔶
रोहे तालुक्यातील आंबेवाडी ग्रा.पंचायतीमधून माणगाव येथे बदली झालेले आदर्श ग्रामसेवक दिलिप मेहता यांना आंबेवाडी ग्रा.पंचायतीच्या वतीने मोठ्या प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आंबेवाडी ग्रा.पंचायत कार्यालयात सदर निरोपसमारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.डिसेंबर १९८५ साली ग्रामसेवक या पदावर त्यांनी आपल्या सेवेस प्रारंभ केला.त्यांची एकूण ३५ वर्षे सेवा होऊन त्यापैकी ९ वर्षे महाड,१ वर्ष श्रीवर्धन व उर्वरीत २५ वर्षे त्यांनी रोहे तालुक्यात सेवा केली. आंबेवाडी ग्रा.पंचायतमध्ये त्यांनी सव्वा वर्ष कामकाज पाहिले. त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून ग्रा.पंचायतीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करून मोठ्या प्रेमाने निरोप देण्यात आला.
सरपंच सुरेश महाबले,उपसरपंच श्रीकांत चव्हाण,सौ.प्रितम पाटील,कांचन वाचकवडे जगन्नाथ थनावडे, कुमार लोखंडे,अविनाश पलंगे,वृशाली लोखंडे,विभावरी लोखंडे,ज्ञानेश्वरी लोखंडे,सुनीता सर्कले,विभावरी शिर्के,पाथेरे भाऊसाहेब आदी उपस्थित होते.
ग्रामसेवक दिलीप मेहता हे सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांशी आदराने व मनमोकळेपणाने वागत असत. कोणाशीही कधीही दुजाभाव दाखवित नसत.त्यांच्या कामाचे स्वरूप अतिशय काटेकोर, स्वच्छ व नीटनेटके असे असायचे.तसेच ग्रा.पंचायत कामकाज व सर्व उपक्रमात ते हिरहिरीने भाग घेत असत.त्यांच्या चांगल्या कामामुळे जि.परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कारही प्राप्त झाला आहे.






Be First to Comment