तिसे येथील प्राणी मित्र पंकज मोरे व अजय मोरे यांनी भेकरीचे वाचविले प्राण
सिटी बेल लाइव्ह / खांब (नंदकुमार मरवडे) 🔷🔶🔶🔷
रोहे तालुक्यातील कोलाड तिसे येथे राहणारे प्राणी मित्र पंकज ज्ञानेश्वर मोरे,अजय सिद्धार्थ मोरे,शुभम सुनील मोरे,या तीन बंधूनी घाबरलेल्या भेकरीची सुखरूप सुटका केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी सहा च्या सुमारास घाबरलेल्या स्थितीत वाट चुकत एक भेकर तिसे या कालव्याच्या शेजारी आढळून आली.या भेकरी वर गावातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला होता.ही बाब तिसे येथील प्राणी मित्र पंकज मोरे,अजय सिद्धार्थ मोरे,शुभम सुनील मोरे,यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या भेकरी ची कुत्र्यान पासून सुटका करून तिला सुखरूप सोडवली तद्नंतर मोरे यांनी वनधिकारी यांना संपर्क साधला व तिसे येथे येण्यास सांगितले.
यावेळी परिमंडळ वनअधिकारी डी डी वारगुडे,श्रीम ए एम पांचाळ वन रक्षक पहुर,एच एम मोतेवनसेवक हे घटनास्थळी हजर होऊन या भेकरीला पोस्टाच्या वाडी मधील जगलं भागात सुखरूप सोडली व हे भेकर पहुर जगलं येथून आले असावी असा अंदाज व्यक्त केला. या भेकरी ची सुखरूप सुटका केल्याने तिसे येथील प्राणी मित्र पंकज मोरे व सहकारी दोन्ही बंदू याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






Be First to Comment