Press "Enter" to skip to content

चौक मध्ये मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶

पाच महिन्यापेक्षा अधिक काळ बंद असलेली मंदिरे खुली करा यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरू केलेल्या घंटानाद आंदोलनात गुरव समाज देखील सामील झाला आहे. चौक तुपगाव येथे शनिवारी अखिल गुरव समाज संघटना कोकण विभाग युवाध्यक्ष  अमोल गुरव घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते.

कोरोना संसर्गाच्या नियमावलीत दैनदिंन व्यवहारावर मर्यादा आल्यानंतर मंदिराना देखील टाळे लावण्यात आले आहे. भाविकांनी शासनाचा आदर ठेवत नियमांचे पालन केले परंतु नियमात शिथिलता येत दारूची दुकाने,हाॅटेल , ढाबे तसेच कारखाने सुरू करताना मंदिर माञ बंदीच्या कचाट्यात ठेवण्यात आली आहेत.मंदिर परिसरात पूजेच्या साहित्यांची विक्रीवर उदरनिर्वाह असलेल्या कुटूंबाना हलाखीचे दिवस आले आहेत.शासनाची कोणतीहि मदत नाहि त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शनिवारी घंटानाद आंदोलन करून अमोल गुरव यानी समाजासमोर उभ्या राहिलेल्या अङचणी देवाचे दार उघङल्याशिवाय संपणार नाही अशी भावना व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.