Press "Enter" to skip to content

प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने निट व जी परीक्षा रद्द करण्याची मागणी

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔶🔷

महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने पुढच्या महिन्यांत होत असणाऱ्या NEET व JEE परीक्षा रद्द करण्याची मागणी प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली. कोरोनाच्या महामारी परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने JEE – NEET च्या परीक्षा घेण्याचे निर्णय घेतला आहे. त्याचा निषेध कर्जत येथे रायगड जिल्हा उपजिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयाच्‍या बाहेर करण्यात आला. व उपजिल्‍हाधिकारी वैशाली परदेशी यांना निवेदन देण्यात आले.

त्याठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष मनोज सुर्वे साहेब, रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे , कर्जत विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सागर परदेशी, युवा नेते फईम अडाल, उरण विधानसभा सुरज पाटील, रसायनी युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश डवळे, खालापूर तालुका NSUI अध्यक्ष कुणाल जाधव, खालापूर तालुका NSUI कार्याध्यक्ष शायान उस्मानी, दिवेश पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.