दिवसभरात जमल्या ९० बॉटल रक्त 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून ) 💠🌟💠🌟
उरणच्या खोपटे पाटीलपाडा गावात गेली ७८ वर्षे मोठ्या भक्तीभावाने साजरा होणाऱ्या गौरा उत्सवात यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेले नाहीत. प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत शिवकृपा गौरा मंडळाने यावर्षी पनवेलच्या एम जी एम रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आज खोपटे येथील मंदिराच्या सभागृहात घेतलेल्या रक्तदान शिबिराला रक्त दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दिवसभर मुसळधार पाऊस असताना देखील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिराला हजेरी लावल्याने दिवसभरात सुमारे ९० बॉटल रक्त जमा झालेले आहे.

सर्वत्र कोरोना सदृष्य परिस्थिती असल्याने शासनाच्या सुचनांचे पालन करत तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून या वर्षी शिवकृपा गौरामंडळ खोपटे-पाटीलपाडा यांनी या वर्षी ७९ वा शिवगौरा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन रक्ताची नितांत गरज लक्षात घेता आज शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .

या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने एम जी एम रुग्णालय पनवेल चे डाॅ. राजेश थोरात, डाॅ. राजेश अत्तरदे, डाॅ. शारदा अंचल आदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सीगचे तंतोतंत पालन करून हे रक्तदान शिबीर राबविले .
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवकृपा गौरा मंडळाचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह सदस्यांनी आणि खोपटे गाव व पाटीलपाड्याचे ग्रामस्थ , पंचकमिटी , ग्रामपंचायातीचे पदाधिकारी , विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आदी सर्वांनी मुसळधार पावसाची ही तमा न बाळगता अतोनात मेहनत घेत हे शिबीर यशस्वी पार पाडले आहे.









Be First to Comment