Press "Enter" to skip to content

गुड न्यूज : महाड तालुक्यात कोरोनाची पिछेहाट


आज सापडले 10 रुग्ण : 12 रुग्णांनी केली मात 🔷🔷🔶🔶


सिटी बेल लाइव्ह / महाड : रघुनाथ भागवत 🌟💠🌟💠


गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीती सर्वांनाच वाटत होती, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे गेली पाच-सहा दिवसात आढळलेल्या कोरोना रुग्णांवरून निदर्शनास येत आहे.

आज महाड तालुक्यात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
महाड तहसीलदार कार्यालयातुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये काळीज येथील 48 वर्षीय पुरुष, महाड येथील 49 वर्षीय पुरुष, आयशा मंजिल दासगाव येथील 32 वर्षीय स्त्री, साई अरकेड कॉम्प्लेक्स महाड येथील 50 वर्षीय पुरुष, आकले येथील 15 वर्षीय स्त्री व 41 वर्षीय पुरुष, कुंभारआळी महाड येथिल 67 वर्षीय स्त्री, श्रीजी रेसिडेन्सी महाड येथील 48 वर्षीय पुरुष, ओलॉन कॉलोनी नांगलवाडी येथील 35 वर्षीय पुरुष व शेंदूरमलई वाकी बु. येथील 56 वर्षीय पुरुष इत्यादी आढळले आहेत.

गेल्या सहा दिवसात महाड तालुक्यात कोरोनाचे 55 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यामुळे कोरोनाने पिछेहाट घेतली असल्याचे या आकडेवारीतुन सिद्ध होत आहे. दरम्यान संपूर्ण देशात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राज्याअंतर्गत लाल परी देखील धावू लागल्याने तसेच कित्येक छोटेमोठे व्यवसाय व कार्यालये देखील सुरू झाले आहेत, त्यामुळे गेली चार-पाच महिने लॉकडाऊनच्या धर्तीखाली गावी थांबलेले चाकरमानी आता हळूहळू मुंबईकडे निघू लागले आहेत.

एकंदर आता कोरोनाची भीती न बाळगता कोरोनाबरोबर जगायला शिकायचे अशीच मनात खूणगाठ बांधून चाकरमानी आपल्या कर्मभूमीकडे जाऊ लागले आहेत.

कोरोनाच्या महामारीतून आज 12 जणांनी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाड तालुक्यात आज पर्यंत 923 कोरोना बाधित रुग्ण सापडले तर 750 रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली. मात्र दुर्दैवाने तालुक्यातील आजपर्यंत 43 जणांनी प्राण गमावले, तर 130 कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.