सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १२ जण सापडले आहेत. २७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटीव्ह १३३४, उपचार करून बरे झालेले ११०६, उपचार घेणारे १६३, मयत ६५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज जेएनपीटी ऑफिसर सो. द्रोणागिरी १, देऊळवाडी उरण ३, बोकडविरा १, सावरखार १, बोरी १, दिघोडे १, धुतुम १, चाणजे २, मुळेखंड १ असे एकूण १२ जण पॉझिटीव्ह सापडले. तर नवघर १, नागाव वारीक आळी ३, सीआयएसएफ लाईन जेएनपीटी १, जेएनपीटी टाऊनशीप २, डोंगरी १, चिरनेर १, म्हातवली २, गौरीनंदन चारफाटा १, भवरा मोरा रोड १, पोलीस कॉलनीच्या मागे म्हातवली २, जसखार २, कोटनाका १, बौद्धवाडा उरण २, नागाव ३, साई माऊली सिद्धिविनायक म्हातवली १, करंजा रोड १, नागाव हिंदू कॉलनी १, दिघोडे १ असे एकूण २७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
उरणमध्ये आज जरी कोरोना पॉझिटीव्ह १२ सापडले असले तरी उपचार घेऊन घरी परतल्यांचा आकडा जास्त असून तो २७ आहे. तर आज कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. ही एक उरणकरांसाठी जमेची बाजू मानली जात आहे.






Be First to Comment