Press "Enter" to skip to content

भाजपच्या घंटानाद आंदोलनाने रायगड दणाणले, मंदिरे खुली करण्याची मागणी

सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔶🔷🔶🔷

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे उघडावीत या मागणीसाठी भाजपतर्फे आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले .

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील व ऍड महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र घंटानाद आंदोलन करण्यात आले . अलिबाग येथील काशी विश्वेश्वर मंदिराबाहेर भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्या नेतृतवाखाली आंदोलन झाले . यावेळी भजनही करण्यात आले .

दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देणारे सरकार मंदिर बंद का ठेवत आहे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला . पनवेल तालुक्यात आ. प्रशांत ठाकूर तसेच पेण, सुधागड तालुक्यात आ. रवींद्र पाटील, उरण तालुक्यात आ. महेश बालदी यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात भाजपने ठिकठिकाणी जोरदार घंटानाद आंदोलने केली.

रोहा येथे समन्वय समितीचे संजय कोनकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग ,अध्यक्ष वसंत शेलार, सौ ज्योती सुनील कुमार, मेघना ओक अशा दिग्गज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राम मारुती चौक येथे सरकारच्या विरोधात घोषणा देत व घंटा वाजून आंदोलन करण्यात आले. यावेळेस भाजप मोर्चा अध्यक्ष अमित घाग यांनी झोपी गेलेल्या सरकारला आतातरी जाग येऊ द्या नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून स्वतः मंदिरे उघडू व जनतेला देवाचे दर्शन देऊ. असा इशारा दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.