Press "Enter" to skip to content

कृषीपर्यवेक्षक नवनाथ गरड यांचे कोरोनाने निधन


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

उरण तालुक्यातील कृषी विभाग कार्यालयात कृषीपर्यवेक्षक म्हणून सेवेत असलेले नवनाथ गरड (४७) यांचा काल कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. उरणमधील सेवेत असलेल्या शासकीय अधिकारी वर्गातील कोरोनाने पहिलाच बळी गरड यांचा गेला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

उरण येथील कृषी कार्यालयात नवनाथ गरड हे कृषीपर्यवेक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ८ ऑगस्टला निष्पन्न झाल्यापासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. ऑक्सिजन कमी झाल्याने त्यांना व्हॅटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल २८ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची झुंज अपयशी ठरत त्यांना मृत्यने गाठले.

त्यांच्या पत्नी व २ मुलांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नवनाथ गरड यांच्या जाण्याने कुटुंबावर हा आघात झाला आहे.
कृषीपर्यवेक्षक नवनाथ गरड यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे सर्वांशी सबंध सलोख्याचे होते. त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याबद्दल अनेकांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उरणमधील अनेक शासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील सर्व अधिकारी कोरोनावर मात करून सुखरूपणे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. परंतु उरण कृषी विभागातील कृषीपर्यवेक्षक नवनाथ गरड हे कोरोनाचे पहिले अधिकारी बळी ठरले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.