सिटी बेल लाइव्ह / खालापूर -प्रतिनिधी ( संतोष शेवाळे) 🔶🔷🔷🔶
खालापूर तालुक्यातील एक नावाजलेली ग्राम पंचायत गोरठण यांनी आपला इतिहास कायम ठेवून उपसरपंचपदी विक्रांत पाटील यांना संधी दिली. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्व सदस्य बिन विरोध देऊन गेली 25 वर्षाची परंपरा कायम ठेवण्यात तेथील ग्रामस्थांना यश आलं. या गावचे जेष्ठ नेते विजय भाऊ पाटील आणि ग्रामस्थ गेली अनेक वर्षे आपल्या पंचायत व गावात निवडणूक न करता सर्व सदस्य बिनविरोध निवडून देऊन शासनाची शाबासकीची थाप घेत आहेत.
माजी उपसरपंच महेश पाटील यांनी गेली अडीच वर्षे चांगल्या पद्धतीने काम करून विकास कामे केली. ठरल्या प्रमाणे अडीच वर्षे पूर्ण होताच आपल्या पदाचा राजेनामा दिला. त्यानंतर आज निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार नुसार आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी उपसरपंच निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी निवडणूक अधिकारी मंडळ अधिकारी संदीप जाधव आणि त्यांचे सहकारी तलाठी ढाकणे आण्णा यांनी काम पाहिलं सकाळी ठीक 10 वाजता विकांत पाटील यांचा अर्ज स्वीकाराला त्या नंतर दुसरा कोणाचाही अर्ज न आल्याने विक्रांत पाटील यांना दुपारी 2 नंतर उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.
त्या समयीं जेष्ठ ग्रामस्थ सुभाष पाटील ,गणपत पाटील,अनंत पाटील,विश्वास साळवी,माजी सरपंच सीताराम पाटील,प्रमोद जाधव ,राकेश जाधव, डॉ. प्रदीप पाटील,पोलीस पाटील ,विद्याधर जाधव, तंटामुखती अध्यक्ष भालचंद्र पाटील,शिवसेना उप तालुका प्रमुख शांताराम हडप,एम आर पाटील,उमेश पाटील,साधूराम कदम,आनंत बुवाजी पाटील,संतोष नामदेव पाटील,शशिकांत गौरू पाटील,सी.डी. पाटील,मधुकर प.पाटील आणि ग्राम पंचायत सदस्य ग्राम सेवक श्रीखंडे ,ग्राम पंचायत कर्मचारी कैलास लबडे यांनी उपसरपंच विकांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment