सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔷🔶🔶🔷
राज्यातील मंदिरे , गुरुद्वारा , जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीमधील मंगलेश्वरी माता व स्वामी समर्थ मंदिरात आज ( ता . २ ९ ) घंटानाद आंदोलन करण्यात आला .
या घंटानादात ‘ दार उघड उद्धवा दार उघड’च्या गजराबरोबरच झोपेत असलेल्या राज्य सरकारला जागे करण्याचे काम करण्यात आले
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास – मदिरा ‘ पुनःश्च हरी ओम ‘ च्या नावाखाली सर्व काही चालू केले . मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘ हरी ‘ ला मात्र बंदिस्त ठेवले आहे . केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर , राज्यातील भाविक व सर्वसामान्य नागरिकांकडून मंदिरे उघडण्याची मागणी केली जात असताना ठाकरे सरकार भक्तगणाऩा कारवाईचा धाक दाखवत आहे.
महाविकास आघाडी सरकार भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे, ‘भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’ असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. केंद्र सरकारने ४ जून २०२० रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू केलेली सुद्धा आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरु करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होत आहे. मात्र पुनश्च ‘हरिओम’ म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. राज्यातील देवस्थानाचे धार्मिक स्थळे सुरू करून भजन किर्तन व भजन परवानगी मिळावी या मागणीकडे निद्रस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत-महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थान तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिक आदिनी आज ( दि 29 ) सर्वत्र देवस्थान मंदिरे धार्मिक स्थळासमोर ‘घंटानाद’ आंदोलन सामाजिक अंतराचे पालन करून करण्यात आले.
कळंबोली मध्ये भर पावसात मंगलेश्वरी माता व स्वामी समर्थ मंदिरा बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी.प्रभाग नं -०८ चे अध्यक्ष श्री.प्रकाश शेलार, भाजप कळंबोली सचिव श्री. संतोष गायकवाड तसेच जेष्ठ नेते श्री.बबन बारगजे, अमर ठाकुर,कमल कोठरी, श्रीकांत ठाकुर,सीत्तु शर्मा, प्रियांका पवार, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment