जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर यांची मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷
देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये बळींचा आकडा ही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबाकडे दिला जात नाही. यामुळे कुटुंबात नाराजीचा सूर आहे. तरी कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींचा मृतदेह हा अंत्यविधीसाठी योग्य ती खबरदारी घेऊन कुटुंबाकडे देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे जिप सदस्या कुंदा ठाकूर यांनी केली आहे.
उरण तालुक्यात जेएनपीटी, ओएनजीसी, डीपी वर्ल्ड, वीज प्रकल्प, बीपीसीएल, सिंगापूर पोर्ट, जिटीआय असे मोठमोठे प्रकल्प कार्यरत असतानाही उरणध्ये सुसज्ज हॉस्पिटल नाही. यामुळेच कोरोना विषाणूने बाधीत असलेल्यांना पुढील उपचारासाठी पनवेल, नवी मुंबई व मुबंई आदी ठिकाणी न्यावे लागत आहे. हे उरणकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
अशा कोरोना बांधितांवर उपचार सुरू असताना काहीं दिवसांनी त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतरही कोरोनाग्रस्ताचा मृतदेह कुटुंबाकडे न देता परस्पर त्याचा अंत्यविधी केला जात आहे. यामुळे कुटुंबात नाराजीचा सूर निघत आहे.
पनवेल व नवी मुंबई पालिकेतून कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकांकडे दिला जात नाही. तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची तयारी संबंधित कुटुंबाकडून घेण्यात येत असतानाही कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृतदेह हा योग्य ती खबरदारी घेऊन कुटुंबाकडे देण्याची मागणी जिप सदस्या कुंदा ठाकूर यांनी केली आहे.






Be First to Comment