सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
चौक हद्दीतील आसरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ,जेष्ठ काँग्रेस नेते विजय(तात्या )कापरेकर यांचे पनवेल येथे उपचारा दरम्यान शनिवारी निधन झाले.आठवङ्यापूर्वीच त्यांच्या पत्नीच निधन झाले होते.
खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष,रायगङ जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशा महत्वाच्या पदावर तात्या कापरेकर यानी काम केले होते.प्रशासकिय कामाची उत्तम जाण, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर तात्यांचा प्रशासनातील अधिका-याना आदरयुक्त धाक होता.दोन वर्षापूर्वी ग्रामसेवक कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या निषेध म्हणून तात्यांनी पंचायत समिती आवारात उपोषण सुरू करताच पंचायत समिती अधिका-यांची धावाधाव झाली होती.निधीचा चेक तात्काळ तात्यांच्या हातात देण्यात आला होता.एक लढवय्ये नेतृत्व खालापूर तालुक्याने गमाविल्याची भावना व्यक्त होत आहे.






Be First to Comment