घोषणांच्या गजरात कर्जत भारतीय जनता पार्टीचे घंटानाद आंदोलन ! 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 💠🌟💠🌟
भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात आघाडी सरकारला जागं करण्यासाठी व मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कर्जत भाजप शहर अध्यक्ष बळवंत घुमरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरामधील लोकमान्य टिळक चौक येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी यांनी घंटानाद आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कपालेश्वर मंदिर,दहिवली विठ्ठल मंदिर,भिसेगाव मारूती मंदिर अशा कर्जत शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये तसेच कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी कडून दार उघड , उद्धवा दार उघड अशा घोषणा देत झोपेचे सोंग घेतलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी कर्जत तालुक्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या घंटानाद आंदोलनात रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे , किसान मोर्च्यांचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे , कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , नगरसेवक तथा कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे , कर्जत तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्नेहा गोगटे , शर्वरी कांबळे, नगरसेविका स्वामीनी मांजरे ,रोहित बाफना,दीपक वैद्य, गोडबोले,काका वैद्य सह भाजपचे अनेक पदाधिकारी या घंटानाद मध्ये सहभागी झाले होते.
…






Be First to Comment