Press "Enter" to skip to content

कळंबोली पोलिसांची कोरोनावर मात

पोलिस कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत 🔶🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी  💠🌟💠🌟

राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असताना, दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांचे  प्रमाणही वाढत आहे. आतापर्यन्त १० हजार १११ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

आज कळंबोली पोलिस ठाण्यातील पाच पोलिसाने कोरोनावर मात करत आपल्या कार्यभार स्वीकारला. त्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यांनी कोरोनावर मात केल्याने इतर कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवण्यात आले आहे. 

  राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या विविध नियमांचे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. आतापर्यन्त पोलिसांकड़ून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अडीच लाखाच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. तर ३३ हजार ५०७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर विविध कारवाईत तब्बल १ लाखाच्या वर  वाहने पोलिसांनी जप्त केले आहे.

या कारवाई दरम्यान राज्यभरात आता पर्यंत साडे बारा हजाराच्या वर  पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात १३०२ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे १००० अधिकाऱ्यांसह ९ हजार १११ असे एकूण १० हजाराच्या वर पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी बरेच जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

असा कोरोना बाधित झालैल्या कळंबोली पोलिस ठाणे हद्दीतील पोहवा/1690 बाळासाहेब गुलींग , पोहवा/1540 शहाजी मेहेर पोहवा/1554 गोपाळ राठोड  मपोहवा/143 सुषमा पाटील  मपोना/2590 रुपाली राऊत यांनी कोरोनावर मात करत  आपल्या कर्तव्यावर हजर झाल्या आहेत. सदयस्थितीत ३०० च्या आसपास अधिकाऱ्यांसह दोन हजारच्यावर  पोलिसांवर विविध  रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.