Press "Enter" to skip to content

बिबट्याच्या दर्शनाने सारंग गावावर व्काॅरटांईनची पाळी

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶

अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी  घराबाहेर पडा सांगण्याची वेळ शासनावर कोरोना विषाणूमुळे आली आहे परंतु तालुक्यातील चौक हद्दीत सारंग गावात बिबट्याच्या फेरफटक्यामुळे नागरिकांना घरात बसण्याची पाळी आली आहे.

चौक लोहप मार्गावर सारंग गाव असून गावातून वाङीकङे जाण्याच्या मार्गावर असलेल्या तलाव नजीक बिबट्या पाहिल्याचे रघुनाथ बामणे या ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा गावातील काही ग्रामस्थांना बिबट्या आणि दोन बछङ्यांनी संध्याकाळच्या वेळेस दर्शन दिल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

ग्रामपंचायतीने तात्काळ वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी आशिष पाटील यांचेसह  कर्मचारी यांनी सारंग गाव व परिसरात शोध मोहिम राबवली.परंतु काही खाणाखुणा आढळल्या नाहीत. तरी सुद्धा ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाकङून देण्यात आल्या आहेत. बिबट्याचा वावरामुळे भीतीने का होईना व्काॅरटांईन सारखी परिस्थिती सारंग गावावर ओढावली आहे.

सारंग गाव परिसरात जंगल भाग नाही. त्यामुळे सर्व शक्यता तपासून पाहत आहोत. मादी आणि दोन पिल्ले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. वनविभाग लक्ष ठेवून असून ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

आशिष पाटील
-वनाधिकारी खालापूर
प्रत्यक्षदर्शी  रघुनाथ बामणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.